चंद्रकांतदादा ! तुमचे डिपॉझिटही जप्त होईल

नंदकुमार गोडसे यांचा घणाघात : ना. पाटील यांच्या वक्तव्याचा गोपूजमध्ये निषेध

वडूज – पवारसाहेबांनी आपल्या मतदारसंघात लक्ष घातल्यास तुमचे डिपॉझिट जप्त होईल. त्यामुळे पवारसाहेबांवर बोलताना भान ठेवावे, अन्यथा आम्ही आपणास त्याच शब्दात उत्तर देऊ असा इशारा नंदकुमार गोडसे यांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा समाचार घेताना दिला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी निवडणूक लढविली तर त्यांचा निश्‍चित पराभव करू असे व्यक्तव्य केले होते. त्यावर गोपूज येथे झालेल्या बैठकीत त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब चव्हाण, माजी सरपंच बाबासाहेब घार्गे, इम्रान बागवान, रोहित मोरे, दत्तात्रय घार्गे, विनोद खराडे, बाबू मुल्ला, सुहेल मुल्ला, प्रशांत राऊत, आनंदा जगदाळे, अधिक जगदाळे, सागर जगदाळे, विजय कुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नंदकुमार गोडसे म्हणाले, पवारसाहेबांचा आदर तुमचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा करतात. त्यांच्यासारख्या जेष्ठ अभ्यासू नेत्यांवर बोलताना आपण किमान विचार करायला हवा होता. जर पवारसाहेबांनी आपल्या भागात लक्ष घातले तर महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या मतदारसंघात तुमचे फिरणे मुश्‍किल होईल, असा टोला गोडसे यांनी लगावला.
आगामी काळात त्यांच्यावर बोलण्याचे धाडस केले तर पवारप्रेमी शांत बसणार नाहीत. मी त्यांच्या पक्षात नसलो तरी मी त्यांच्यावर प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणूकीची चिंता तुम्ही करू नका. माढा मतदारसंघात पवारसाहेब उभे राहिलेच तर आम्ही विक्रमी मतांनी त्यांना निवडून देऊ, असेही गोडसे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)