चंद्राबाबू नायडू यांची प्रशांत किशोर यांच्यावर प्रखर टीका

प्रकासम -आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्राशेखर राव यांच्यावर टीका केली आहे. याचबरोबर, राजकीय रणनीतीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावरही एन. चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आरोप केले आहेत.

प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशातील लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली आहेत, असा आरोप यानी केला आहे. नायडू म्हणाले, प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशमधील लाखो मतदार हटविले आहेत. ते सायबर गुन्हा करत आहेत.

याचबरोबर, याआधीही एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी, टीआरएस आणि भाजपावर मतदारांची नावे मतदार यादीतून हटवल्याचा आरोप केला होता.

एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी टीआरएस आणि भाजपासोबत मिळून मतदार यादीतून मतदारांची नावे हटवण्याचा प्रयत्न केला होता. मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यासाठी त्यांनी फॉर्म 7 घेतला होता. त्यामुळे फॉर्म 7 घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)