चंद्राबाबू नायडूंचा बंगला जमीनदोस्त होणार

हैदराबाद – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांची आलिशान प्रजा वेदिका ही इमारत तोडण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या या इमारतीत चंद्राबाबू राहात आहेत. काही दिवसांपूर्वीच नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून प्रजा वेदिका इमारतीला विरोधी पक्षनेत्यांचे सरकारी निवासस्थान घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, वायएसआर कॉंग्रेसने अमरावतीतील प्रजा वेदिका इमारत ताब्यात घेतली आहे. तसेच मंगळवारपासून ही इमारत पाडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सूडभावनेने ही कारवाई केल्याचा आरोप तेलगू देशम पक्षाने केला आहे. या इमारतीतील विरोधी पक्षांचे कार्यालयातील महत्त्वाच्या वस्तू इमारतीबाहेर फेकण्यात आल्याचेही टीडीपीने म्हटले आहे.

आंध्र प्रदेशने आपला राज्यकारभार हैदराबादहून अमरावतीला हलवल्यावर चंद्राबाबू कृष्णा नदीजवळील उंदावल्लीतील प्रजा वेदिकामध्ये राहात होते. हैदराबादला तेलंगणाची राजधानी घोषित करण्यात आल्यानंतर आंध्र प्रदेशने आपला कारभार अमरावतीला हलवला होता. आंध्र प्रदेश सरकारने क्षेत्र विकास प्राधिकारणाद्वारे तत्कालीन मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून प्रजा वेदिका इमारत उभारली होती. या इमारतीत प्रशासकीय कामांसह पक्षाच्या बैठकीही होत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)