चंद्राबाबु नायडुंची पुन्हा दिल्लीत विरोधपक्ष नेत्यांशी चर्चा

19 जानेवारीला कोलकात्यातील रॅलीत होणार विरोधी ऐक्‍याचे प्रदर्शन

नवी दिल्ली: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज दिल्लीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. भाजपच्या विरोधात सर्व प्रमुख राजकीय पक्षांची भक्कम आघाडी उघडण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. येत्या 19 जानेवारी रोजी तृणमुल कॉंग्रेसने कोलकाता येथे एक संयुक्त जाहीर सभा आयोजित केली असून या सभेसाठी ममता बॅनर्जी यांनीही सर्वच प्रमुख विरोधी पक्षांना निमंत्रण दिले आहे ते निमंत्रण बहुतेक पक्षांनी मान्य केले असून त्या दिवशी तेथे सर्वच प्रमुख विरोधी पक्षांच्या ऐक्‍याचे दर्शन घडेल असा विश्‍वास नायडू यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नायडू यांची दिल्लीतील ही दुसरी राजकीय भेट होती. त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार इत्यादी नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर पवार म्हणाले की आम्ही ममता बॅनर्जी यांनी कोलकाता रॅलसाठी दिलेल्या निमंत्रणावर चर्चा केली आम्ही दोघांनीही त्या रॅलीला जायचे ठरवले आहे. नायडू म्हणाले की कोलकाता रॅलीला सर्वच प्रमुख विरोधी पक्षांचे नेते येतील अशी अपेक्षा आहे. त्यावेळी आम्ही चर्चा करणार आहोतच पण आवश्‍यकता भासल्यास पुन्हा दिल्लीत एक स्वतंत्र बैठक घेऊन आम्ही पुढील राजकीय दिशा निश्‍चीत करणार आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)