पहाटे चारपर्यंत चंदा कोचर यांची चौकशी

मुंबई – आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर यांची पहाटे चार वाजेपर्यंत ईडीच्या मुंबई कार्यालयात कर्ज घोटाळा प्रकरणात कसून चौकशी करण्यात आली. त्यांना आज पुन्हा दुपारी याच कार्यालयात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. पण आज दुपारी त्यांची अर्ध्या तासाच्या चौकशीनंतर सुटका करण्यात आली.

ईडीने काल उद्योगपती वेणुगोपाल धूत यांचीही रात्री अकरा वाजेपर्यंत चौकशी केली अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्या आदल्या दिवशी या दोघांशी संबंधीत ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते त्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले होते. संगनमताने कर्ज मिळवून मनिलॉंड्रिंगचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हेही आरोपी आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)