संगणकावर पाळत ठेवण्याच्या निर्णयाला आव्हान

नवी दिल्ली: सीबीआय, ईडीसह देशातील दहा सर्वोच्च सुरक्षा यंत्रणांकडे देशभरातील नागरीकांच्या संगणकावर पाळत ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील एक वकिल मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सरकारने 20 डिसेंबर रोजी एक अधिसूचना काढून आयबी, सीबीआय,ईडी, महसुल गुप्तचर, आयकर विभाग, रॉ इत्यादीएकूण दहा संस्थांना कोणत्याही संगणकांत घुसखोरी करून तेथील माहिती तपासण्याचे व डाटा संकलीत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सरकारी यंत्रणांना देण्यात आलेले हे अधिकार म्हणजे सामान्य माणसांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करण्याचा सरकारचा उद्देश आहे त्यातून लोकांची प्रायव्हसीच धोक्‍यात आली आहे असा मुख्य आक्षेप शर्मा यांनी आपल्या याचिकेत घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
100 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)