आव्हानात्मक आधुनिक स्त्री

आधुनिक कालखंडापर्यंतच्या काळाचा विचार केला तर स्त्री महिला सबलीकरण, सक्षमीकरण, स्वातंत्र्य, समानता यात नक्‍कीच बदल होत गेले. आजच्या आधुनिक स्त्री चा विचार करताना तिच्यासमोर येवू घातलेल्या आव्हानांचा ही विचार आला.

पूर्वी स्त्री केवळ उपभोग्य वस्तू म्हणून तिच्यावर हक्‍क मात्र त्यांचे दूरस्थ परिणाम भागण्याची जबाबदारी फक्‍त स्त्रीचीच, आताही फारसा फरक पडला असेल असे नाही. फक्‍त स्वतःच स्वतःच बचाव करण्याचे तंत्र ती शिकली हे ही नकळत या महिलांसमोरील आव्हानच म्हणता येते. शिक्षणामुळे थोड्याफार प्रमाणात बदल झाला असले तरी निम्नस्तरात राहणाऱ्या मुलींना अजुनही आपल्या घरच्या जबाबदाऱ्या पेलून शिक्षणाचा मुलभूत हक्‍क मिळतो तिला त्याची पुरेशी माहिती मिळविण्यासाठीही झगडावे लागते हे ही एक आव्हानच.

कायद्यानेही महिलांना अनेक संधी दिल्या पण संकुचित समाज मनाचा विचार करता त्याचा उपभोग घेण्यासाठी तिला मानसिकरित्या सक्षम होण्याचे आव्हानच आहे. तरतुदी केवळ कागदापुरत्याच मर्यादित दिसतात त्याची माहिती निम्नस्तरातील महिलापर्यंत पोहचविणारी यंत्रणा हि सक्षम होईल जी महिलांचा आत्मविश्‍वास वाढविल मानसिकता तयार करेल हे ही आव्हान पेलावे लागेल.

एखाद्या स्त्रीवर अन्याय झाल्यावर केवळ कायदे, शिक्षण, सवलती यांचे पाठबळ मिळून देण्यासाठी तिलाच एक सखी म्हणून उभे रहावे लागणार हे ही एक आव्हानच, स्वसरक्षणांसाठी काही धडे देणे, तिला तिच्या हक्‍काविषयी जागृत करणे ही सगळी आव्हाने पुन्हा स्त्रीलाच पेलावे लागणार.

स्वतःला सिध्द करण्यासाठी ती धडपडतेयं पण पुरूषप्रधान समाजाच्या कक्षा भेदत तिला संस्कार, कुटूंब, समाज या सगळ्यांच्या समतोल साधण्याचेही एक आव्हान पेलावे लागतंय. मग कुठे तरी तिचा जीव घुसमटतोय, कशाला प्राधान्य दयावं हा ही एक तिच्या पुढचा एक यक्ष प्रश्‍न आव्हानचं.

महिला सक्षमीकरणांने स्वातंत्र्य मिळाले पण तिच्या समोर आव्हानेही तेवढीच ठाकलीत. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार विभक्‍त कुटूंब पध्दती किंवा आजही समाजात मुलीने आई वडिलांना सोडून सासरी जावून राहणे क्रमप्राप्त मग ती एकुलती एक असेल तर नविन आव्हाने तिला पेलावी लागतील. आर्थिक दृष्ट्‌या ती स्वतंत्र असुनही लग्नानंतर तिला मयार्दा येतातच ते ही एक मोठे आव्हान तिच्या समोरील म्हणावे लागेल.

घरगुती जबाबदाऱ्या पेलून स्वतःला सिध्द करण्याचे, स्वतःचे स्वत्व टिकवण्याचे आव्हान पेलतांना पुन्हा देशाचा विचार केला तर महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताची युवा पिढी संस्कारक्षम, सुशिक्षित घडवण्याची जाबाबदारी ही पुन्हा महिलांवरच ही एक आव्हानात्मक जबाबदारीच एक समाजाचा भाग म्हणून तिला आव्हान म्हणून पेलावे लागते. एक शक्‍तीस्वरुपीणि सारखी झुंजणारी ही एकविसाव्या शतकातील “महिला आधुनिक स्त्री’ झाली खरी पण तिच्या समोरील आव्हानांची मालिका पुन्हा एकदा नकळत तिला पुरूषप्रधान संस्कृतीचाच एक घटक बनवू पाहते का? स्वतःला सिध्द करण्यासाठी तिने स्वतःच अग्नि परिक्षा देणे क्रमप्राप्त का? एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना स्त्री कालची, आजची, उद्याची अशी तिची गणना न करता केवळ एक स्त्रीच जी महान आव्हाने सक्षमरित्या पेलते अशी एक महिलाशक्‍ती असेच करणे योग्य ठरेल, अशा आव्हानांत्मक स्त्रीचे दर्क्षण या आधुनिक स्त्रीचा विचार करताना डोळ्यासमोर आले.

– मधुरा धायगुडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)