अलोक वर्मांनी कारवाईला दिले सुप्रिम कोर्टात आव्हान 

मध्यरात्री पावणेबारा वाजता सरकारने पाठवले सक्तीच्या रजेवर

नवी दिल्ली – सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा, विशेष महासंचालक राकेश अस्थाना आणि अन्य अधिकाऱ्यांना सक्तीचा रजेवर पाठवण्याचा आदेश केंद्र सरकारने मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमाराला काढला. त्यानंतर आज सकाळीच अलोक वर्मा यांनी आपल्यावरील या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर येत्या शुक्रवारी सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दर्शवली आहे.

केंद्र सकारने काल मध्यरात्री दोघांबरोबरच सीबीआय प्रमुखांबरोबर काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर सीबीआय प्रमुखांच्या पथकातील एक प्रमुख अधिकारी ए के बस्सी यांची थेट अंदमानला बदली करण्यात आली आहे. या साऱ्या घटना वेगाने घडल्याने त्याचे राजकीय पडसादही आता उमटू लागले आहेत. या अधिकाऱ्यांची सीबीआय मुख्यालयाच्या 10 व्या आणि 11 व्या मजल्यावर कार्यालये होती त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे तपासण्याचे कामही आता हाती घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षता आयोगाचे प्रमुख के व्ही चौधरी यांनी सीबीआय प्रमुख व उपप्रमुखांकडील सर्वाधिकार काढून घेऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची सूचना सरकारला केली होती. सीबीआय प्रमुख वर्मा यांनी राकेश अस्थाना यांच्यावर एका व्यावसायिकाकडून 3 कोटी रूपयांची लाच घेतल्याचा जाहींर आरोप केला आहे. तर अस्थाना यांनी वर्मा यांच्यावर त्याच व्यावसायिकाकडून 2 कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. राकेश अस्थाना हे गुजरात केडरचे अधिकारी असून ते मोदींचे लाडके अधिकारी आहेत असा आरोप आता होऊ लागला आहे. दरम्यान प्रख्यात कायदेतज्ज्ञ प्रशांत भुषण यांनी म्हटले आहे की पंतप्रधान, सरन्यायाधिश इत्यादींचा समावेश असलेल्या समितीकडून अलोक वर्मा यांची सीबीआय प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असल्याने या समितीच्या मान्यतेशिवाय त्यांच्यावर सरकारला कारवाई करता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)