चाकण हिंसाचारप्रकणी 18 युवकांना अटक

15 तरुणांना बुधवारपर्यंत कोठडी : तिघे अल्पवयीन

चाकण/पुणे – येथे सोमवारी (दि. 30) झालेल्या हिंसाचारात वाहनांची तोडफोड व जाळपोळ करणाऱ्यांपैकी 18 तरुणांना चाकण पोलिसांनी बुधवारी (दि. 1) मध्यरात्री अटक केली होती. त्यांना बुधवारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता यातील तिघे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानी करण्यात आली आहे. तर 15 तरुणांना बुधवार (दि. 8) पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश ठेवण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी दिला. दरम्यान, 100 पेक्षा अधिक तरुणांची सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटली असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील व चाकण पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनोज दौलत गिरी (वय 23), सूर्यकांत बाळू भोसले (वय 21), परमेश्‍वर राजेभाऊ शिंदे (वय 22), अभिषेक विनोद शाह (वय 19), विशाल रमेश राक्षे (वय 26), सत्यम दत्तात्रय कड (वय 19), समीर विलास कड (वय 20), रोहिदास काळूराम धनवटे (वय 19), विकास अंकुश नाईकवाडी (वय 28), सोहेल रफिक इनामदार (वय 19), प्रवीण उद्धव गावडे (वय 23), आकाश मारुती कड (वय 25), आनंद दिनेश मांदळे (वय 18), प्रसाद राजाराम खांडेभराड (वय 18, सर्व. रा. खेड) तर सचिन दिगंबर आमटे (वय 27, रा. बीड) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहर आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्‍न असेल तर अटक आरोपीना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात येते. त्यानुसार या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणात अटक आरोपींसह चार-पाच हजार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी आणि ज्ञानेश्‍वर मोरे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. हे प्रकरण गंभीर असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या गुन्ह्याचे कट कारस्थान कुठे रचले आहे, त्याचा सूत्रधार कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता. त्यांना हत्यारे कोणी पुरवली आणि याप्रकरणी आणखी हत्यारे जप्त होऊ शकतात. त्यांनी पेट्रोल बॉटल कोठून आणले याचा तपास कारवायचा आहे. त्यांचे इतर साथीदार कोण होते याबाबत प्रत्येकाकडे वैयक्तिक चौकशी कारवयाची आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. पुणे बार असोसिएशनतर्फे मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे खटले मोफत लढण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅॅड.सुभाष पवार, अॅॅड मिलिंद पवार, अॅॅड एस. आर.घाटगे आणि बारमधील इतर वकिलांनी बचाव पक्षातर्फे बाजू मांडली.

खायला, प्यायला दिले नाही
अटक करण्यात आलेल्या आरोपींना नियमितप्रमाणे न्यायदंडाधिकारी कटारे यांनी “तुम्हाला काही सांगायचे आहे का’ अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपी म्हणाले की, बुधवारी मध्यरात्री बारा वाजता आम्हाला राहत्या घरातून चौकशीसाठी घेवून जातो, असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात आम्हाला पोलीस ठाण्यात आणून आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आमच्या अटकेबाबत आमच्या कुटुंबीयांना सांगितले नाही. पोलिसांनी आम्हाला न्यायलयात हजर करेपर्यंत पाणी, खायलाही दिले नाही, असे सांगताना त्यांना रडू कोसळले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)