टी.ई.टी पात्र उमेदवारांचे प्रमाणपत्र वितरण

नगर – अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण (प्राथमिक) विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सन-2018 मध्ये पात्र ठरलेल्या परीक्षार्थींची प्रमाणपत्रे महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांचेकडुन प्राप्त झालेली आहेत.

सदर पात्र ठरलेल्या परीक्षार्थीचे प्रमाणपत्र वितरण शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद कार्यालयात दि.1 एप्रिल ते दि. 5 एप्रिल या कालावधीत वितरीत करणेत येणार आहेत. सदर परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित रहाणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत, डी.टी.एड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंबा गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र (आवश्‍यकतेनुसार), अपंगत्वाचे प्रमाणपत्र (आवश्‍यकते-नुसार), ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.) आदिंपैकी कोणतेही एक ओळखपत्र बरोबर आणणे आवश्‍यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)