केंद्रीय पथकाच्या दुष्काळ पाहणीस प्रारंभ

पहिल्या टप्प्यात होणार मराठवाड्यातील जिल्ह्यांची पाहणी

औरंगाबाद: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाची पाहणी करण्यास केंद्राच्या पथकाने आजपासून सुरूवात केली आहे. या पाहणी पथकाने पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील टेंभापुरी धरण परिसरातील गावांची पाहणी केली.

-Ads-

राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत 10 अधिकाऱ्यांचे पथक मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. केंद्रीय सहसचिव छावी झा या पथकप्रमुख आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भागातील ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते. शिवाय दुष्काळी दौऱ्याच्या एका पथकाने गंगापूर तालुक्‍यातील मुरमी गावात शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाहणी पथकासमोर त्यांची व्यथा मांडली. तिसऱ्या पाहणी पथकाने जालन्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पथकाने जवसगाव आणि बेथलम गावांना भेट दिली.

दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निर्मूलनासाठी सात हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी बहुतांश तालुक्‍यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सप्टेंबरमधील भूजल पातळीत घट झालेल्या तालुक्‍यातील संख्या 56 एवढी आहे. परिणामी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीरही केला. मात्र, दुष्काळ कालावधी शेतकऱ्यांना मदत देण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंत विविध बाबींची टंचाई सर्वत्र आहे. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. ती रक्कम किती याची आकडेवारी जरी देण्यात आली असली तरी आपत्ती काळात मदत करण्याच्या निकषानुसार केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर आले आहे. हे पथक मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी तर विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागांची पाहणी करणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)