नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्राची मंजूरी; आज लोकसभेमध्ये मांडणार

ईशान्येकडील राज्यांमधून विधेयकाला मोठा विरोध

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमधील ज्या बिगर मुस्लिम नागरिकांना भारताचे नागरिकत्व हवे असेल, त्यांना ते देण्याची तरतूद या दुरुस्ती विधेयकामध्ये आहे. हे विधेयक उद्या (मंगळवारी) लोकसभेमध्ये मंजूरीसाठी मांडले जाण्याची शक्‍यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संसदेच्या संयुक्‍त समितीकडे हे विधेयक छाननीसाठी पाठवण्यात आले होते. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मंजूरी दिली. हे विधेयक सर्वप्रथम 2016 मध्ये संसदेमध्ये मांडण्यात आले होते.

आज मंजूरी दिलेल्या दुरुस्ती विधेयकानुसार नागरिकत्व कायदा 1955 मध्ये दुरुस्ती करण्यात येईल. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमधून हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्‍चन धर्माचे नागरिक जर 6 वर्षांपेक्षा अधिक काळ भारतात रहिवासी असतील तर त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसली तरी त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल, असे या विधेयकात म्हटले आहे. भाजपने 2014 च्या निवडणूकीत या विधेयकाचे आश्‍वासन दिले होते.
आसाम आणि ईशान्य भारतातील अन्य राज्यांमध्ये मात्र या विधेयकाला मोठ्या प्रमाणावर विरोध होतो आहे. या विधेयकामुळे 1985 च्या आसाम ठरावाचा भंग होईल, असे या राज्यांमधील पक्ष आणि संघटनांचे म्हणणे आहे.

1958 च्या आसाम ठरावानुसार 1971 नंतर आसाममध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीस विदेशी समजले जाईल, असे या ठरावामध्ये म्हटले आहे. ईशान्येकडील 8 विद्यार्थी संघटना, 40 पेक्षा अधिक संघटनांनी या विधेयकाच्या विरोधात 11 तासांचा बंद पुकारला होता.

देशाचे नागरिकत्व धर्माच्या आधारे दिले जाऊ शकत नाही, असे म्हणत कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, मार्क्‍सवदी कम्युनिस्ट पार्टी आणि अन्य काही पक्षांनी सातत्याने या विधेयकाला विरोध केला आहे. आपले विरोधी मत काही विरोधकांनी “जेपीसी’च्या अहवालातही नोंदवले आहे. भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि संयुक्‍त जनता दलानेही या विधेयकाला विरोध दर्शवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)