मुंबई : मुंबईत सीएसएमटी स्टेशनसमोर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची घटना घडल्याने मध्य रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले असून मध्य रेल्वे प्रशासनाकडून आता भांडुप, कुर्ला, विक्रोली, दिवा, आणि कल्याण स्थानकांवरील पादचारी पूल म्हणजेच फूट ओव्हर ब्रिज हटविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाकडून याबाबत निविदा मागविण्यात आल्या असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
तत्पूर्वी १४ मार्च रोजी मुंबईतील सीएसटी स्थानकावरील पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते.
https://twitter.com/ANI/status/1108010238224011265
Ads