ॲपवर येणार केंद्राच्या कामाचा ताळेबंद

नवी दिल्ली – निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार जानेवारी महिन्यात स्वतःच्या योजनांची आकडेवारी जनतेसमोर मांडणार आहे. सरकारने या योजनांशी संबंधित डेटा प्लॅटफॉर्म जनतेसाठी उघडण्याची तयारी केली आहे.

शहरी क्षेत्रांच्या विकासयोजना ज्यात स्मार्टसिटी, सर्वांसाठी घर, अमृत, स्वच्छ भारत आणि हृदय अंतर्गत होणाऱ्य़ा पायाभूत विकासकामांना जियो टॅग करून एका विशेष ॲपच्या माध्यमातून लोकांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या उपक्रमामुळे लोकांना संबंधित योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीची माहिती मिळू शकेल. शहरी विकास मंत्रालयाने ॲप विकसित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या ॲपमध्ये सर्व पायाभूत विकासकामांना जियो टॅग केले जाणार आहे. यानंतर त्यांना चित्रफिती, छायाचित्रे आणि त्यांच्या पत्त्यासह ऍपवर अपलोड केले जाईल. ग्रामीण विकास मंत्रालय पंतप्रधान आवास (ग्रामीण) योजनेकरता असा उपक्रम राबवत आले आहे. याकरता सर्वात मोठे आव्हान स्वच्छ भारत मोहिमेबद्दल असल्याचे अधिकाऱ्य़ांनी म्हटले.

या मोहिमेंतर्गत 62 लाख घरगुती शौचालये आणि 5 लाख सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. हे ॲप सादर करण्यासोबतच सरकार एक व्हिडिओ वॉल तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. हे व्हिडिओ वॉल शहरी विकास मंत्रालयाच्या निर्माण भवनातील तळमजल्यावर निर्माण केले जाणार आहे. याकरता सार्वजनिक बांधकाम विभाग मागील दोन महिन्यांपासून प्रयत्नशील आहे.

व्हिडिओ वॉलच्या मदतीने कोणीही आकडेवारी मिळवू शकतो. यात शहरांच्या बिंदूंना स्पर्श केल्यावर अनेक आयकॉन समोर येतील, यात विविध गृहयोजना आणि शहरी विकासाच्या योजनांचा तपशील असणार आहे. त्यांना स्पर्श केल्यावर योजनेशी संबंधित सर्व माहिती ज्यात त्यांचे लक्ष्य, कामगिरी, कंत्राटे आणि प्रकल्पपूर्तीची तारीख मिळू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)