दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून 4714.28 कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली – दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 4714.28 कोटींची मदत जाहीर केली आहे.कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने पूर, भूस्खलन,ढगफूटी, गाजा वादळ आणि 2018-19 मधील दुष्काळग्रस्त सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशांना एकूण 7 हजार 214.03 कोटी रूपयांच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यांना जाहीर केलेली मदत

महाराष्ट्र : 4714.28 कोटी (दुष्काळ)
कर्नाटक : 949.49 कोटी रूपये (दुष्काळ)
आंध्र प्रदेश : 900.40 कोटी रूपये (दुष्काळ)
हिमाचल प्रदेश : 317.14 कोटी रूपये (पूर आणि भूस्खलन)
उत्तर प्रदेश : 191.73 कोटी रूपये(पूर)
गुजरात : 127.60 कोटी रूपये (दुष्काळ)
पाॅडेचरी : 13.09 कोटी (वादळ)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या मदतीनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचे ट्विटरवर आभार मानले आहेत.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1090165446219911169

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)