महिला आरक्षणालाही केंद्राने मंजुरी द्यावी : सुप्रिया सुळे

तिहेरी तलाकवरून सुरू असलेल्या राजकारणाला विरोध

नवी दिल्ली: “तिहेरी तलाक’पेक्षा केंद्राने महिला आरक्षणाला तातडीने मंजुरी द्यावी. त्यानंतर देशातील चित्र नक्की बदलेल, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. महिलांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका, तिहेरी तलाकच्या विधेयकाला विरोध नाही, पण पद्धतीला विरोध आहे. सामाजिक बदल हा झालाच पाहिजे. काय चुकीचे आणि काय बरोबर हे येणारी पिढी ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संसदेत सुरू असलेल्या तिहेरी तलाकच्या विधेयकाच्या चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी तिहेरी तलाकबरोबरच संसदेतील महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला आहे. सुळे म्हणाल्या, कोणीही सामाजिक परिवर्तनाच्या विरोधात नाही. आमचा फक्त तिहेरी तलाकवरून सुरू असलेल्या राजकारणाला विरोध आहे. महिलांना सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हा मुद्दा तुमचा आणि माझा नव्हे, तर तो महिलांचा मुद्दा आहे. तिहेरी तलाकसारखा मुद्दा अध्यादेशाच्या माध्यमातून सोडवण्याऐवजी सर्वसमावेशक मार्ग स्वीकारला पाहिजे.

या तिहेरी तलाकच्या विधेयकामुळे पुरुष आणि महिलांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होईल का?, याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे. तुम्ही पतीच्या कुटुंबीयांना धमकावून जेलमध्ये पाठवाल, त्याने काय सिद्ध होणार आहे. हे विधेयक मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणले जात असल्याचे सांगितले जाते. परंतु कुठली व्यक्ती स्वतःच्या अधिकारापासून वंचित आहे, याचाही सरकारने विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

आपण महिलांना मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला हवे. विवाहसंस्था कुटुंब आणि पिढ्या प्रभावित करत आहेत. मुस्लिम महिलांचा आवाज लोकसभेत उठविण्यात आला. तिहेरी तलाक हा दंडनीय गुन्हा बनविण्याच्या विरोधात कोण आहे? चुकीचा अर्थ लावणाऱ्यांमागे किंवा धर्माचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कोण आहे?, अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही महिला सैन्यदलासाठी मजबूत आणि शक्तीशाली आहोत, हे आम्ही वेळोवेळी सिद्धही केले आहे. मग आम्ही का महिलांच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या शिक्षणावर बोलत नाही? आपण विधेयकावर पुन्हा विचार करायला हवा, हा गंभीर मुद्दा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)