भिलाई स्टील प्लांट दुर्घटना-सीईओसह तिघांवर कारवाई; केंद्राकडून मदत जाहीर

भिलाई (छत्तीसगड): भिलाई स्टील प्लांटमध्ये मंगळवारी झालेल्या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी विरेंद्र सिंह यांनी भिलाईत येऊन घटनास्थळाला भेट दिली. या दुर्घटनेस जबाबदार धरून सीईओ एम. रवी यांना बडतर्फ करण्यात आले असून जनरल मॅनेजर (सेफ्टी) डी पंडियाराजा आणि डीजीएम (एनर्जी) नवीन यांना निलंबित करण्यात आले आहे.

त्याचबरोबर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना चौधरी विरेंद्र सिंह यांनी भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 35 ते 95 लाख रुपये, गंभीर जखमींना 15 लाख रुपये आणि इतर जखमींना 2 लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. ही भरपाई लवकरात लवकर पोहोच करण्यासाठी पोलाद सचिवांना आदेश दिल्याचे आणि मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला भिलाई स्टील प्लांटमध्ये नोकरी देण्यात येणार असल्याचेही चौधरी विरेंद्र सिंह यांनी सांगितले.

-Ads-

कामातील बेपर्वाईमुळे ही दुर्घटना झाल्याचे चौधरी विरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. स्टील प्लांटमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात 11 जण मरण पावले आणि 9 जण जखमी झाले होते. जखमींवर उपचारासाठी दिल्लीतील एम्समधील 4 डॉक्‍टर भिलाईत दाखल झाले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)