काश्‍मीरातील बऱ्याच भागात तणावानंतर संचारबंदी

श्रीनगर: अलकायदाशी संबंधीत झाकीर मुसा नवाच्या दहशतवाद्याची चकमकीत हत्या झाल्यानंतर काश्‍मीरच्या बऱ्याच भागात शुक्रवारी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था आणि अन्य महत्वाचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्या भागातील तणावाची स्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

काही ठिकाणची इंटरनेट सेवाहीं बंद करण्यात आली आहे. त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसा आपल्या दोन अन्य दहशतवाद्यांसह ठार झाला आहे. तो अलकायदाशी संबंधीत असलेल्या अन्सार गझवात उल हिंद या विघटनवादी संघटनेचा प्रमुख म्हणून काम करीत होता. त्याच्या मृत्युच्या वृत्तानंतर शोपिया, पुलवामा, अवंतीपोरा, आणि श्रीनगर मध्ये जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)