सिमेंटचे उत्पादन 6 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता – इक्रा

मुंबई : या वर्षी भारतात सिमेंटचे उत्पादन 6 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, कच्च्या मालाचे दर वाढणार असल्यामुळे कंपन्याच्या नफ्यावर परिणाम होईल, असे इक्रा या संस्थेने म्हटले आहे.पूर्व भागातील सिमेंट कंपन्याच्या उत्पादनात भर पडण्याची शक्‍यता आहे. मागणी कमी असल्यामुळे कंपन्याच्या उत्पादनाची क्षमता पुरेशा प्रमाणात वापरली गेलेली नाही. या वर्षीही कंपन्या आपल्या क्षमतेच्या केवळ 70 टक्‍के सिमेंट उत्पादन करणार आहेत.

2018 मध्ये सिमेंटचे उत्पादन 6.3 टक्‍क्‍यांनी वाढून 298 दशलक्ष टण झाले. 2017 मध्ये ते 280 दशलक्ष टन एवढे होते. 2018 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सिमेंटच्या उत्पादनात वाढ झाली आहे. आता अगामी काळात किफायतशीर घर निर्मीती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातून मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे त्या भागातूनही मागणी वाढण्याची शक्‍यता असल्याचे ईक्राचे उपाध्यक्ष सबयासची मुजूमदार यानी सांगितले.आगामी काळात विजेचा खर्च वाढणार आहे. त्याचबरोबर इंधन महाग असल्यामुळे वाहतूक खर्चही वाढणार आहे. याचा कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मात्र त्यामुळे या कंपन्याचे अर्थकारण बिघडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)