सिमेंटची मागणी वाढणार; भारतात सिमेंटचा दरडोई वापर अत्यल्प

नवी दिल्ली – भारताचा विकासदर वेगाने वाढणार आहे. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने पायाभूत सुविधा व घर उभारणी क्षेत्राला चालना दिली आहे. त्यामुळे सिमेंटची मागणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.2 पटीने वाढणार आहे.

अल्ट्रा टेक या सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपनीने जारी केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे की, केंद्र सरकारने खासगी गुंतवणूक वाढत नसल्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे चालूच ठेवले आहे. त्याचबरोबर 2022 पर्यंत सर्वांना घर मिळावे याकरिता कमी दराच्या घराला केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्याबरोबर व्याजदरातही आगामी काळात काही प्रमाणात कपात होण्याची शक्‍यता आहे. या कारणामुळे सिमेंटची मागणी वाढणार आहे. त्यामुळे कंपन्यांना उत्पादन क्षमता वाढवावी लागणार आहे.

जगात सिमेंट उत्पादनात भारत जगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात दर वर्षी 472 दशलक्ष टन एवढे सिमेंट तयार करण्याची क्षमता आहे. भारतात 65 उद्योगसमूहाकडून 225 सिमेंट कारखाने चालविले जातात. असे असले तरी भारताचा दरडोई सिमेंटचा वापर केवळ 210 किलो आहे. विकसनशील देशात हे सर्वात कमी प्रमाण आहे. त्याचबरोबर जागतिक दरडोई वापरही भारतापेक्षा जास्त म्हणजे 580 किलो आहे. चीनमध्ये सिमेंटचा दरडोई वापर तब्बल 1780 किलो इतका आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)