कराड शहर व तालुक्‍यात शिवजयंती उत्साहात

प्रशासकीय कार्यालयांमध्येही शिवजयंती साजरी

कराड – युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत येथील दत्त चौकातील अश्‍वारूढ पुतळ्यास पालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त छ. शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा फुलांनी सजविण्यात आला होता. प्रारंभी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक राजेंद्र माने, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. तसेच शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्येही शिवजयंती साजरी करण्यात आली. काही गणेश मंडळांनीही विविध गड व किल्ल्यांवरून शिवज्योत आणून शिवजयंती साजरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)