साताऱ्यात जल्लोष…

गोरे बंधुंच्या कार्यकर्त्यांची आतषबाजी
म्हसवड  – माढा मतदार संघांत भाजपचे उमदेवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयी झाल्याने म्हसवड शहरात भाजपा व महायुतीतील घटक पक्षासह निंबाळकर यांना जाहिर पाठिंबा देणारे आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे या बंधुच्या कार्यकर्त्यांनी चौकाचौकात फटाके वाजवुन आनंदोत्सव साजरा केला.

बहुचर्चित समजल्या गेलेल्या माढा मतदार संघातील लोकसभेची लढत मोठी अटीतटीची झाल्याचे दिसून आले. या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा तब्बल 84 हजार 927 मतांनी पराभव करत भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांनी बाजी मारल्याने माण तालुक्‍यात निंबाळकर समर्थकांनी मोठा जल्लोष केला निंबाळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच कार्यकर्त्यानी चौकाचौकात फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फटाके वाजवुन पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी म्हसवड शहर अध्यक्ष अरविंद पिसे, भाजपा शिक्षक आघाडीचे विश्‍वंभर बाबर, ओ.बी.सी. तालुका अध्यक्ष विजय टाकणे, भारतीय जनता पार्टीचे माण तालुका विस्तारक सदानंद ठेंगील, रत्नदिप शेटे, संतोष पिसे, अमोल पिसे, धनाजी शिंदे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर या निवडणुकीत निंबाळकर यांना जाहिर पाठींबा देणारे कॉग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून चौकाचौकात फटाके वाजवुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, सुरेश म्हेत्रे, बी. एम. अबदागिरे, अखिल काझी, बाळासाहेब पिसे, सोमनाथ केवटे, लुनेश विरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तर शेखर गोरे यांच्या समर्थकांनी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्‍याची आतषबाजी केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय रोकरे, संजय टाकणे, प्रकाश डावकरे, संग्राम शेटे, सचिन डोंबे, संजय चिंचकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)