अमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रथमच दिवाळी साजरी 

वॉशिंटन (अमेरिका) – अमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रथमच दिवाळीचा सण साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना आणि अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री जॉन सुलिव्हन मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहींमधील समन्वयाची आणि भागीदारीची झलक या कार्यक्रमात पाहावयास मिळाली.

दिवाळी सण साजरा करत असताना भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील समन्वयाबरोबरच सहिष्णूता, विविधता, स्वातंत्र्य आणि न्याय आदी मूल्यांचे दर्शन झाले, असे जॉन सुलिव्हन यांनी या प्रसंगी म्हटले आहे. दिवाळी साजरी करण्याचा हा समारंभ म्हणजे भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील वाढत्या परस्पर सहयोगाचा संकेत असल्याचे नवतेज सरना यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाने मिळून दिवाळी सण साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांसह सुमारे 200 अतिथी या समारंभास उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)