पुणे – रमजान ईदनिमित्त इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवानी सामुहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. महिनाभराच्या उपवासानंतर हा सण साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने रमजान ईदला विशेष महत्व आहे. नमाज पठण झाल्यानंतर राष्ट्रामध्ये शांतता रहावी. सर्वधर्मीय एकोपा रहाण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.