होळी, धुळवड पर्यावरणपूरक साजरी करा

 महापालिका प्रशासनाचे आवाहन

पुणे – होळीसाठी लाकूडफाटा न तोडता पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

होळीसाठी मोठ्या प्रमाणात लाकूड आणि गोवऱ्या वापरल्या जातात. यानिमित्ताने झाडांची तोड केली जाते. दिवसेंदिवस झाडांचे प्रमाण कमी होत चालले आहे. या सणासाठी झाडे तोडली तर अप्रत्यक्षरित्या वृक्षतोडीला, लाकडांच्या अवैध विक्रीला समर्थन देत आहोत, असे या आवाहनात म्हटले आहे.

जागतिक तापमानवाढ होत आहे, दुसरीकडे दुष्काळ आणि जमीनीची धूप, वन्य प्राण्यांचे वसतिस्थान नष्ट होत आहे. त्यातून ते मानवी वस्तीत येत आहेत. यामुळे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होत आहेत. दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी आजच सावध होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ही पर्यावरणपूरक होळी साजरी केली पाहिजे, असे या आवाहनपत्रात नमूद केले आहे.

संपूर्ण गावात, गल्लीबोळात होळी साजरी करण्यापेक्षा एक गाव एक होळी प्रतिकात्मक रित्या साजरी केली पाहिजे. याशिवाय रंगपंचमीलाही घातक रंगाचा वापर टाळावा, तसेच पाण्याचा अतिवापरही टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. रंगपंचमीही प्रदूषण विरहित साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)