जम्मू – जम्मूतील राजौरी या सीमावर्ती गावात दहा पॉईंटसवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावात प्रवेश करण्याचा मार्ग आणि गावातून बाहेर जाण्याच्या मार्गांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहेत. पोलिसांच्या सुचनेनुसार हे कॅमेरे तेथे तैनात करण्यात आले आहेत. त्याद्वारे गावांतील संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले जाणार असून त्या कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षांमध्ये चोवीस सात लक्ष ठेवले जाणार आहे.
राजौरी हे गाव सीमावर्ती भागात असल्याने ते अत्यंत संवेदनशील आहे. काही समाजकंटकांचा आणि घुसखोरांचा तेथे वावर असल्याची बाब या आधीही लक्षात आली असून राजौरी परिसरात पाकिस्तान प्रशिक्षीत घुसखोर आणि सुरक्षा जवानांमध्ये या आधी अनेक वेळा चकमकी झाल्या आहेत.