नजीब बेपत्ता प्रकरणाची चौकशी सीबीआय थांबवणार 

सुप्रिम कोर्टाने दिली क्‍लोजर रिपोर्ट सादर करण्याची अनुमती 
नवी दिल्ली: जेएनयु विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमद याच्या बेपत्ता होण्याविषयीचा तपास थांबवण्याचा निर्णय सीबीआयने घेतला असून या विषयी क्‍लोजर रिपोर्ट सादर करण्याची सीबीआयची विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. हा विद्यार्थी दोन वर्षांपुर्वी बेपत्ता झाला असून त्याचा अजून ठावठिकाणा लागलेला नाही.
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून काढून घेऊन तो एसआयटीकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका नजबीच्या मातोश्री फातिमा नफीस यांनी सादर केली होती.
नजीबच्या संबंधात त्यांच्या मातोश्रींना जो काही आक्षेप आहे तो त्यांनी ट्रायल कोर्टापुढे मांडावा त्यांच्या म्हणण्यावर तेथे विचार होईल असे न्यायालयाने म्हटले आहे. नजीबच्या बेपत्ता होण्याविषयी देशभर चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. त्या संबंधात सीबीआयने म्हटले आहे की नजीबच्या संबंधातील सर्व शक्‍यता आम्ही तपासून पाहिल्या. पण या प्रकरणात जो आरोप केला जात आहे त्या कोणत्याही आरोपांत आम्हाला तथ्य आढळले नाही. नजीब हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माही-मांडवी वसतीगृहात राहात होता. तेथून तो 15 ऑक्‍टोबर 2016 रोजी बेपत्ता झाला आहे.
संघ परिवार प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर त्याची बाचाबाची झाल्यानंतर तो बेपत्ता झाला आहे त्यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांनीच त्याचे अपहरण केले असावे असा आरोप केला जात होता. तथापी त्या आरोपात तथ्य नसल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सीबीआयने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)