नीरव मोदी प्रकरणी सीबीआयचे पथक जाणार लंडनला

नवी दिल्ली – मोठ्या प्रमाणात बॅंकांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी तेथील कोर्टात निर्णय होणार आहे. दरम्यान त्याला ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी सीबीआयचे एक पथक लंडनला पाठवण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे. तो लंडन मध्ये फिरत असल्याच्या बातम्या फोटोसह तेथील एका दैनिकात प्रकाशित झाल्यानंतर त्याला लंडन पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला असून त्याच्या अर्जावर शुक्रवारी निर्णय होणार आहे.

दरम्यान त्याला भारताच्या हवाली करण्यात यावे अशी मागणी भारतामार्फत ब्रिटन सरकारकडे करण्यात आली आहे. पण त्यासाठी तेथील कोर्टाची अनुमती घेणे आवश्‍यक ठरले आहे. या प्रक्रियेला चालना देण्यासाठीच सीबीआयचे पथक तिकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)