सीबीआयकडून वर्षभरात 206 गुन्ह्यांची नोंद

नवी दिल्ली: गतवर्षात केंद्रीय कर्मचा-यांविरोधात सीबीआयने 206 भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदविली आहेत, अशी माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत दिली. ही प्रकरणे गतवर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात नोंद करण्यात आली आहेत. यापैकी फक्‍त 45 जणांवरच चार्टशिट दाखल करण्यात आली आहे. सिंह म्हणाले की, केंद्र सरकारने जानेवारी 2015 पासून 23 प्रकरणांमध्ये 17 आयएएस अधिका-यांविरोधात खटला चालविण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान, 2017मध्ये 338, 2016मध्ये 400 आणि 2015मध्ये 441 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. यापैकी अनुक्रमे 168, 272 आणि 361 जणांवर चार्टशिट दाखल करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)