मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत गैरव्यवहार; सीबीआयचे 22 शैक्षणिक संस्थांवर छापे

नवी दिल्ली -पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड या राज्यांमधील विविध 22 शैक्षणिक संस्थांवर सोमवारी सीबीआयकडून छापे टाकण्यात आले. या राज्यांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीशी संबंधित कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा संशय आहे.

शिष्यवृत्तीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी अज्ञात अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर छापे टाकण्यात आले. यामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि मागासवर्गीय शिष्यवृत्तींचा समावेश आहे. जवळपास 250 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सीबीआय प्रवक्‍त्याने दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणारा शिष्यवृत्तीचा निधी दुसऱ्याच व्यक्तींच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सीबीआयच्या पथकांकडून छापा घालण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांशी संबंधित उना, कमाल, मोहाली, नावानशहर, अंबाला, सिमला, सिरमोर, सोलान, बिलासपूर, चंबा, गुरुदासपूर, कांग्रा आदी ठिकाणच्या शाखांवर छापे घालण्यात आले, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. या शिक्षण संस्थांना शालेय आणि शालेय शिक्षणानंतरच्या शिष्यवृत्त्यांचा निधी सरकारकडून जमा होत होता. मात्र संबंधित मागास वर्गीय लाभार्थ्यांपर्यंत हा निधी पोहोचत नव्हता. हिमाचल प्रदेश सरकारच्या विनंतीवरून या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)