काँग्रेसच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांवर सीबीआयचे छापे; काँग्रेसने म्हटले, ‘भाजपने गैरसमजूतीत राहू नये’

चंदिगढ – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नते भुपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे घातले आहे.त्यांनतर दिल्ली आणि नोएडामध्येही सीबीआयने 30 ठिकाणी छापे घातले आहेत.

मानेसर याठिकाणी 912 एकर जमीन वाटपात घोटाळा झाल्याच्या आरोप हुड्डा यांच्यावर आहे. त्याचप्रकरणी सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केल्याच समजत आहे. या कारवाईनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. या छापेमारीनंतर काँग्रेसकडून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कांँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, ‘काँग्रेस पार्टी सीबीआयचा दुरूपयोगाने घाबरेल, अशा गैरसमजूतीत भाजपाने राहू नये, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो’. आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही. केंद्र सरकार सरकारी एजन्सीचा चुकीचा वापर करून त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या लोकांना घाबरू पहात आहे. याचमुळे सरकार काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री यांच्यावर निशाना साधत कारवाई करत आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘भाजप केवळ अशाप्रकारे आम्हाला त्रास देऊ इच्छित आहे. आनंद शर्मा पुढे म्हणाले की, छापेमारीची वेळ पाहता हे स्पष्ट होत आहे की, केवळ विरोधक लोकांना बदनाम आणि परेशान करण्यासाठी ही छापेमारी चालू आहे’.

https://twitter.com/AnandSharmaINC/status/1088746417651310592

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)