चंदा कोचरविरोधात एफआयआर करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली…

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणारे सीबीआय अधिकारी सुधांशू धर यांची बदली करण्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी सुधांशू धर यांनी चंदा कोचर यांच्या विरोधात कारवाई केली होती. त्यांना रांची येथे आर्थिक अपराध विभागात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी विश्‍वजीत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हिडियोकॉनच्या रु. 3,250 कोटी रुपये कर्जाच्या अनियमिततेबाबत चंदा कोचर यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडियोकॉन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्यावरही एफआयआर दाखल केलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी चंदा कोचर प्रकरणात सीबीआयला लक्ष्य केले होते. त्यांनी सीबीआयला दुस्साहसापासून दूर राहण्याचे आणि केवळ दोषींवर लक्ष केंद्रित करण्याचा उपदेश केला होता. व्यावसायिक तपास आणि दुस्साहस यात फरक असल्याचे प्रतिपादन त्यांनी ट्विट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)