सीबीआय नव्हे बीबीआय – ममता बॅनर्जी 

कोलकाता  – केंद्रीय गुन्हा अन्वेषणमधील (सीबीआय) भ्रष्टाचारावरुन सुरु असलेल्या कलहाने आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रात्रीतून सीबीआयच्या संचालकांना हटवल्यावरुन देशात आता आरोपांची राळ उडाली आहे. भाजपाच्या या निर्णयावर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हल्लाबोल केला आहे.

ममता यांनी सीबीआयला “भाजपा ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन’ अशी उपमा दिली आहे. ममता बॅनर्जींनी ट्विट करत सीबीआय आता बीबीआय (भाजपा ब्युरो ऑफ इन्वेस्टिंगेशन) बनली आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुटीवर पाठवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यात सुरु एकमेकांवर सुरु असलेल्या लाचखोरीच्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने संयुक्त निर्देशक एम नागेश्वर राव यांच्याकडे पदभार दिला आहे. राव यांनी आज पदभार स्वीकारताच 13 अधिकाऱ्यांची बदली केली आहे. यात अस्थाना यांची चौकशी करणाऱ्या डेप्युटी एसपी अजय बस्सी यांचा समावेश आहे. बस्सी यांची पोर्ट ब्लेअरला बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)