सीबीआय संचालकांची दक्षता आयोगापुढे पुन्हा हजेरी

सहकाऱ्यांनी लावलेले आरोप फेटाळले

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक अलोक वर्मा हे आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी दक्षता आयोगापुढे हजर राहिले. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि अन्य अधिकाऱ्यांनी वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि अन्य गैरप्रकारचे आरोप लावले आहेत. त्याचा खुलासा करण्यासाठी त्यांनी दक्षता आयोगापुढे ही हजेरी लावताना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले.

दक्षता आयोगाचे प्रमुख टी. एम भसिन आणि शरद कुमार यांच्यापुढे आपली कैफियत सादर करताना त्यांनी प्रत्येक मुद्‌द्‌याच्या अनुषंगाने आपली बाजू मांडली व सारे आरोप धुडकाऊन लावले. सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमुर्ती ए. के. पटनाईक यांच्या निरीक्षणाखाली ही चौकशी करण्याची सुचना दक्षता आयोगाला केली होती तेही यावेळी उपस्थित होते. वर्मा आज सकाळी दक्षता आयोगाच्या कार्यालयात आले ते तेथे सुमारे तासभर होते.

बैठकीनंतर त्यांना गाठून बोलते करण्याचा प्रयत्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला पण वर्मा यांनी कोणाच्याही प्रश्‍नांना उत्तर देण्याचे टाळले. वर्मा यांच्या विरोधातील चौकशी पंधरा दिवसांत पुर्ण करून त्या विषयीचा अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे. येत्या शनिवारी ही पंधरा दिवसांची मुदत संपत असून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)