सीबीआयसह इतर संस्था वाचविण्याची आवश्‍यकता

हैदराबाद – सीबीआय व इतर संस्था कमकुवत करण्याचा मोदी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हे सरकार खाली खेचण्यासाठी सर्व विराधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करीत असल्याचे आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.

आगामी 2019च्या निवडणुकीत मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेतली आहे.

मोदी सरकारच्या काळात संविधानिक संस्थांना धोका निर्माण झाला आहे. याविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष नेत्यांनी एकत्र यायला हवे. कॉंग्रेस भलेही 17 राज्यांमध्ये भाजपाकडून हरली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहील. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीच्या मोहिमेला कॉंग्रेसने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, नायडू यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती.

गेल्या चार वर्षांत देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या विविध संस्थांना कमकुवत करण्याचा केंद्रसरकारकडून प्रयत्न चालू आहे. या संस्थांचा वापर केंद्रसरकार राजकीय हितासाठी करून घेत आहे. त्यामुळे या संस्था कमकुवत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा आगामी निवडणुकात पराभव करण्याची गरज आहे. यासाठी आपले मतभेत बाजूला सारून जास्तीत जास्त विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे.
– चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश

चंद्राबाबू नायडू माध्यमांशी बोलताना म्हणाले, आपल्याला या देशाला इथल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. सीबीआय अडचणीत आहे. आरबीआयवर देखील हल्ला होत आहे. ईडी, इन्कम टॅक्‍स विभाग यांचा वापर विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केला जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या ठिकाणी विरोधकांविरोधात या संस्थांचा वापर केला जात आहे. राफेलवर पंतप्रधान मोदी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

दोन वर्षानंतरही अद्याप नोटाबंदीचे फायदे दिसून आलेले नाहीत. इंधनाचे भाव वाढतच आहेत. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था धोक्‍यात आली असून महागाईतही वाढ झाली आहे. देशातील अल्पसंख्याकांवरही दबाव असून संविधानही धोक्‍यात आले आहे. टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वी कॉंग्रेस प्रमुख राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वोसर्व शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती आणि तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)