गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयकडून लष्कराच्या ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाकडून आज राशन पुरवठ्यामध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी एका कर्नल सहित पाच लष्करी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेश येथे नेमण्यात आलेल्या लष्कराच्या जवानांना राशन पुरवठा करणाऱ्या एका ठेकेदाराकडून या अधिकाऱ्यांनी १८ लाखांची लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांवर थेट सीबीआयकडून पुरवठ्यामधील घोटाळ्यावरून अशा प्रकारे गुन्हा दाखल केल्याची ही दुसरी घटना आहे. अलीकडेच अशा प्रकारच्या एका अन्य घटनेमध्ये सीबीआयकडून लष्करी अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर प्रकरणामध्ये सीबीआयकडून कर्नल रमण दहडा,  लेफ्टनंट कर्नल महेंद्र कुमार, सुबेदार देवेंद्र कुमार, हवलदार अभय सिंह, सुबेदार साहुर साहू व पुरवठादार केके यंग्फो यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतगर्त देखील आरोप लावण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)