आंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी 

चंद्रबाबू नायडू यांचा केंद्र सरकारला झटका

हैदराबाद – सीबीआयमध्ये अंतर्गत वाद सुरू असतानाच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशमधील कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील तपाससंस्था असलेल्या सीबीआयला निर्बध घातले आहेत. यामुळे मोदी सरकारमधून बाहेर पडलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला आणखी एक जोरदार झटका दिला आहे.

आंध्र प्रदेश सरकारने आज दिल्ली विशेष पोलीस दलाला दिलेली संमती रद्द केली आहे. यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार समोरासमोर आले आहे. आता यापुढे सीबीआयच्या अधिका-यांना आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश जरी करायचा असल्यास सरकारची मंजुरी घेण्याची आवश्‍यकता राहणार आहे. आंध्रच्या सरकारने तपास संस्थेच्या अधिका-यांना ही नोटीस पाठविली आहे.

पहिल्यांदाच आगाऊ संमती घेतल्याविना शोध आणि तपास करण्यासाठीचा अधिकार काढून घेतल्याची अधिसूचना जारी केली आहे. सीबीआयची निर्मिती भारत सरकारद्वारा 1941 मध्ये स्थापन झालेल्या विशेष पोलीस प्रतिष्ठानने केली होती. आंध्रच्या सरकारने सीबीआयमधील घोटाळ्यांमध्ये अधिका-यांची नावे आल्याप्रकरणी आक्षेप नोंदवला आहे. यामुळे एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी यापुढे सीबीआयला तपासासाठी बोलावण्यात येणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने वैयक्‍तिक बदला घेण्यासाठी राज्याचेच अस्तित्व संपुष्टात आणण्याचा कट रचला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी बिहार आणि अन्य राज्यातील गुंड्यांकडून काही धार्मिक ठिकाणांवर हल्ल्यांची शक्‍यता त्यांनी वर्तविली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)