कारणे अस्थिसांध्याच्या विकाराची  

1. शरीरक्षमता कमी – अस्थिसांध्याचे बरेचसे विकार शरीरक्षमता कमी झाल्यामुळेही निर्माण होतात.

2. नवीन विषयुक्‍त पदार्थ तयार होणे – शारीरिक अकार्यक्षमतेमुळे बाहेरच्या असात्म्य पदार्थामुळे शरीरात अटीजन तयार होते. ते आणि शरीरातील ओक (टॉक्‍सीन) यांच्या संबंधातून नवीन विषयुक्‍त पदार्थ तयार होऊन सांध्याचे आजार निर्माण होतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

3. रक्‍तातील आम्लता वाढ – रक्‍तातील आम्लता वाढल्यामुळे लॅटिक ऍसिड, युरिक ऍसिड यांचे प्रमाण जास्त होते.

4. जंतुसंसर्गामुळे विकार – कधी कधी शरीरात कोठे जंतुसंसर्ग असेल तरीही हा विकार वाढतो.
उत्तम शौच होणे गरजेचे

सांध्याचे विकार असणाऱ्यांनी आपल्या आतड्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. आहार शास्त्रानुसार “उत्तम शौच’ होणे हे स्वास्थ्याचे लक्षण आहे. निरोगी आतड्यात चयापचयासाठी आवश्‍यक जीवजंतूही असतात. आवश्‍यक प्रोटीन्स, जीवनसत्त्वे विशेषतः अफ कमी पडले इंटेस्टिनल फ्लोरा कमजोर होते.

त्यामुळे आतड्यातील अस्तराची निमुळती टोके बोथट होतात. कॅल्शियमसारखे पदार्थ कमी पडले तर स्नायूंमध्ये शिथिलता येते व अन्न रगडणे, धुसळणे ही प्रक्रिया असते, ती कमजोर होते. त्यातून आजाराचा प्रादुर्भाव होतो.
म्हणूनच आपणास संधिवातासारख्या आजारापासून अगदी घरच्या घरी उपचार करायचा असेल तर उपचाराची चतुःसुत्री पाळावी लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)