जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

पुणे – यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दि.14 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नसल्याने निदर्शनास आले. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याबाबतची पावती सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे आणि प्रवेश देण्यात आले.

-Ads-

तथापि, विद्यार्थ्यांना दि. 10 ऑगस्टपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांनी वेळेत हे प्रमाणपत्र प्राप्त करू शकले नाहीत. त्यामुळे राज्य शासन आणि बार्टी तथा समन्वयक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रमाणपत्र सादर करण्याच्या अंतिम तारखांना मुदतवाढ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दि. 14 ऑगस्टपर्यंत हे प्रमाणपत्र करावेत, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅॅण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, एमबीए आणि एमएमएस या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता यापुढे मुदतवाढ मिळणार नाही. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास, संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील, असेही तंत्रशिक्षणने स्पष्ट केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)