कोल्हापूर मध्ये १० लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त

कोल्हापूर- कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर नाकाबंदी दरम्यान १० लाख ५ हजार रुपयांची रोकड रक्कम जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूर मधील शाहूवाडी तालुक्यामध्ये आंबा चेक पोस्ट वर निवडणूक विभागाच्या स्थिर निरीक्षण पथकाकडून  कारवाई करण्यात आली असून सदर रोख रक्कम मोटार गाडीत आढळली आहे.

शाहूवाडी पोलिसांनी रक्कम जप्त करून पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या ताब्यात दिली असल्याची माहिती मिळाली असून , गाडी चालकाकडून रोख रक्कमेची चौकशी सुरू आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)