अनुपम खेरसह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुझफ्फरपूर (बिहार): बिहारमधील न्यायालयाने अभिनेते अनुपम खेर, अक्षय खन्ना यांच्यासह अन्य 15 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. “द ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून काही मोठ्या लोकांची बदनामी केली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आज मंगळवारी मुझफ्फरपूर न्यायालयाचे न्यायाधीश गौरव कमल यांनी हे आदेश दिले आहेत.

याबाबत सुधीर ओझा यांनी कांती पोलीस स्टेशनमध्ये 2 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांची भूमिका निभावत अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे मला आणि अनेकांना वाईट वाटले असल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. तक्रारीत त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधातही तक्रार करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“द ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. कॉंग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)