कार्लोस सेल्डरान यांचा संदेश मार्गदर्शक

किरण पवार : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संदेश
गुरूनाथ जाधव

सातारा – जगण्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी कार्लोस सेल्डरान यांचा संदेश सर्व रंगकर्मीना मार्गदर्शक असल्याची माहिती नाट्यदिग्दर्शक व संश्‍लेषक किरण पवार यांनी दिली. 27 मार्च हा दिवस दरवर्षी “जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा करण्यात येतो.1962 साली ज्यो कॉक्‍चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.

यावर्षी क्‍यूबामधील कार्लोस सेल्डरान या उत्कृष्ट नाट्य संचालक, नाटककार आणि नाट्य प्रशिक्षकाच्या संदेशाची निवड करण्यात आली असल्याचे किरण पवार यांनी सांगितले. कार्लोस सेल्डरान यांच्या संदेशाचा अनुवाद लुईस लेलेरेना डायझ यांनी केला आहे त्यांचे मराठी रूपांतरण सांगताना किरण पवार म्हणाले, 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना 20 वे शतक हे अस्तित्ववादी विचारांचे द्योतक होते. त्याचेच रूपांतरण आजच्या नाटकांमध्ये तसेच रंगकर्मीमध्ये प्रकर्षाने जाणवते.

नाटक करताना जगण्याची पोकळी आणि जगण्याची दिशा अंधाराकडून प्रकाशाकडे सूचित करण्याचे काम आजच्या नाट्यकर्मींना करणे अपरिहार्य आहे. यासाठी कार्लोस सेल्डरान यांचा संदेश मागदर्शक आहे. सातारचे रहिवाशी असलेले किरण पवार हे कला आणि सौदर्यशास्त्र विभागाअंतर्गत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी नवी दिल्ली येथे नाट्य व सादरीकरण या विषयामध्ये पीएच.डी. करत आहेत. सातारा येथे युथ थिअेटर वर्कशॉपच्या माध्यमातून गेली 5 वर्षे ते नाटक व नाट्य प्रशिक्षणाचे काम करीत आहेत.

कार्लोस सेल्डरान यांचा संदेश

जगात कोणत्याही केंद्रात किंवा विशेषाधिकारात इमारतीमध्ये रंगमंच अस्तित्वात नसल्याचे सिद्ध करणारा कोणीही नाही. जेव्हा मला समजू लागले की थिएटर स्वतःमध्ये एक देश आहे, संपूर्ण जगाला व्यापणारा एक प्रमुख क्षेत्र, माझ्यामध्ये एक दृढनिश्‍चय झाला, जो स्वातंत्र्याच्या साहाय्याने जाणवत होता. तुम्हाला दूर जायची गरज नाही किंवा तेथून तुम्ही पुढे जाऊ नका. आपल्याला चालविण्याची किंवा स्वतःला हलविण्याची गरज नाही. आपण कुठेही सार्वजनिक आहात. हा आपल्या लोकांच्या कल्पनाशक्तीचाच एक प्रवास आहे. जो सर्वात दूरच्या जमिनीत पेरली जाणारी एक बी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)