आंबी खालसा येथून बोलेरो कार चोरीस

संगमनेर- पुणे-नाशिक महामार्गावरील आंबी खालसा शिवारात रात्री घरासमोर उभी केलेली बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली. दिनकर रामभाऊ गाडेकर (वय 46, रा. प्रभाकरनगर, आंबी खालसा, ता. संगमनेर) यांनी याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पुणे-नाशिक महामार्गालगत आंबी खालसा शिवारातील प्रभाकरनगर परिसरात शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास दिनकर गाडेकर यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीची बोलेरो कार (क्र. एमएच- 12 जीव्ही- 6723) चोरट्याने बनावट चावीच्या मदतीने चोरून नेली. पार्क केलेल्या ठिकाणी वाहन न आढळल्याने गाडेकर यांनी आसपास शोध घेतला.

वाहन चोरी झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. एम. विखे करत आहेत. दुचाकी चोरीच्या घटना सुरू असताना आता मोठ्या वाहनांचीही चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये वाहन चोरट्यांची धास्ती निर्माण झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here