रिऍल्टी क्षेत्रात भांडवलाचा तुटवडा

संग्रहित छायाचित्र...

-एनबीएफसीकडील भांडवल सुलभता वाढविण्याचे मागणी

-घरांवरील जीएसटी कर शक्‍य तितक्‍या लवकर कमी करावा

नवी दिल्ली – रेरामुळे रिऍल्टी क्षेत्रातील प्रकल्पाचा खर्च 70 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. कारण त्यातील 70 टक्‍के रक्कम विकसकांना वापरता येत नाही. त्याचबरोबर बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थाकडून मिळणारे भांडवल कमी झाले आहे. त्यामुळे भांडवलाअभावी रिऍल्टी क्षेत्र अडचणीत आले आहे. अर्थसंकल्पात भांडवल सुलभता वाढविण्यासाठी काही मोठे निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर जे प्रकल्प अर्धवट आहेत. त्यासाठी 2000 कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची गरज असल्याचे विकसकांनी अर्थमंत्रालयाला सांगितले आहे.

या मागण्याचे निवेदन सादर केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना नार्डको या संघटनेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की परवडणाऱ्या घरासाठीचा जीएसटी दर सध्याच्या 8 टक्‍केवरून इनपुट टॅक्‍स क्रेडिटसह 5 टक्‍के करण्याची गरज आहे.त्याचबरोबर इतर घरासाठी जीएसटी दर इनपुट टॅक्‍स क्रेडीटसह 8 टक्‍के करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी सांगतिले की, आयएलएफएस प्रकरणानंतर भांडवलाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे आम्ही सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला सांगितले आहे. आता पुन्हा या बाबीकडे आम्ही अर्थमंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. कारण या बाबीचे परिणाम आगामी काळात रेंगाळू शकतात. त्याबरोबर सरकारने जीएसटी कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीकडून लवकर निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. कारण जीएसटी कमी होण्याची शक्‍यता असल्यामुळे ग्राहक कुंपणावर बसून आहेत. सरकारने याबाबत लवकर निर्णय घेतला तर विक्री वाढण्यास चालना मिळण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर सरकारने मुद्रांक शुल्काचाही जीएसटीत समावेश करण्याची गरज आहे.

ते म्हणाले की, ही आमची मागणी फार जुनी आहे. मात्र त्याकडे सरकार फारशा गांभीर्याने पाहात असल्याचे दिसून येत नाही. त्याचबरोबर नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा यांच्या एकत्रित परिणामामुळे अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत. त्याचा विकसक आणि ग्राहकांना त्रास होत आहे. असा परिणाम झालेले 2.5 लाख ग्राहक सध्या दिल्ली आणि लगतच्या परिसरात आहेत. त्यासाठी 2000 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. हे प्रकल्प पूर्ण होऊन त्याची विक्री झाल्यानंतर सरकारला तो निधी परत मिळू शकणार असल्याचे त्या.नी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)