साताऱ्याच्या मतमोजणीसाठी उमेदवाराला हवी आहेत मुले

वर्तमानपत्रात दिली जाहिरात: जनतेच्या भुवया उंचावल्या
सातारा – निवडणुकीच्या सभांसाठी पैसे देवून लोक आणल्याच्या घटना आजपर्यंत समोर आल्या होत्या. मात्र, आता दि. 23 मे रोजी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतमोजणीसाठी मुले हवी आहेत, अशी चक्क जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात आली आहे. यामुळे साहजिकच जनतेच्या भुवया उंचावल्या असून बदलत्या राजकारणाचे प्रातिनिधिक स्वरूप समोर आले आहे.

एकेकाळी निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदान केंद्रावर आणि मतमोजणीसाठी कार्यकर्त्यांच्या उमेदवारांकडे रांगा लागायच्या. मात्र, आता उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची वाणवा निर्माण झाली आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून उमेदवारांना मतमोजणीसाठी मुले हवी असल्याची जाहिरात देण्याची वेळ आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने अशी जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रतिनिधी नेमायचे आहेत. त्यासाठी विशेषत: साताऱ्यातील सुशिक्षित युवक-युवती तसेच विद्यार्थी यांच्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साहजिकच जाहिरातीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर निवडणूकीतील मतमोजणी प्रक्रिया देखील अनुभवता येणार आहे. ही जमेची बाजू असली तरी काळाप्रमाणे राजकारण बदलत असल्याचे एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणावे लागेल. एकेकाळी कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी हवे ते संकट ओढावून घेण्यासाठी पुढे यायचे. मात्र, राजकारण्यांबद्दल समाजात टप्प्या टप्प्याने विश्‍वासहर्ता कमी झाली आणि कार्यकर्त्यांचा ही राजकारणाकडील ओढा कमी झाला. त्याचाच एक भाग म्हणून मतमोजणीसाठी दिलेल्या जाहिरातीकडे पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)