चंद्रपुरात बांगडेंऐवजी धानोरकरांना उमेदवारी 

कॉंग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर 

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि जम्मू काश्‍मीरमधील 10 उमेदवारांचा समावेश असून त्याती चार उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत अकोलामधून हिदायत पटेल, रामटेक येथून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

कॉंग्रेसच्या आजच्या यादीतील धक्कादायक घोषणा म्हणजे याआधी चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण नव्या यादीत त्यांची उमेदवारी रद्द करत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आमदारकीचा राजीनामा देणारे सुरेश धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता चंद्रपूरमधून भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर अशी लढत पाहायला मिळेल. त्याच बरोबर कॉंग्रेसने हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या ऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, चंद्रपुरातून विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. एका नाराज कार्यकर्त्याने याबाबत फोन करुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचार केली होती. त्यावर माझं पक्षात कुणी एकत नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. मात्र ही क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत हायकमांडने चंद्रपुरातून धानोरकरांना उमेदवारी दिली आहे.

तारिक अन्वर यांचाही समावेश 
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम्‌ यांचे सुपत्र किर्ती चिदंबरम्‌ यांना शिवगंगा (तमिळनाडू) मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्‌ठी देवून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांना कतिहार (बिहार) मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कर्नाटकातील दक्षिण बंगळुरूमधून बी. के. हरिप्रसाद, जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला येथून हाजी फारूक मीर, बिहारमधील पूर्णियामधून उदयसिंह उर्फ पप्पू सिंह आणि किशनगंज येथून मोहम्मद जावेद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)