द्रमुकने जाहीर केले उमेदवार

चेन्नाई: तामिळनाडुत द्रमुक आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली असून राज्यातील एकूण 39 जागांपैकी द्रमुकला 20 जागा देण्यात आल्या असून पॉंडेचरीतील एका जागेसह कॉंग्रेसला एकूण दहा जागा देण्यात आल्या आहेत. बाकीच्या जागा अन्य पक्षांना देण्यात आल्या आहेत.

द्रमुक पक्षाने त्यांच्या वाट्याला आलेल्या सर्व 20 जागांचे उमेदवार आज जाहीर केले. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. एस अलिगीरी, एमडीएमकेचे वैको हे द्रमुकच्या मुख्यालयात उपस्थित होते. या आघाडीला पक्षाचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी धर्मनिपेक्ष पुरोगामी आघाडी असे नाव दिले आहे.

-Ads-

द्रमुकला चेन्नाईतील तीन मतदार संघांच्या जागा देण्यात आल्या आहेत त्यात चेन्नाई उत्तर, चेन्नाई दक्षिण आणि चेन्नाई मध्य या तीन मतदार संघांचा समावेश आहे. या आघाडीत इंडियन युनियन मुस्लिम लीग, केएमडीके या पक्षांनाही स्थान देण्यात आले आहे. या निवडणुकीत आमच्या पक्षाला प्रचंड यश मिळेल असा दावा द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांनी केला.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)