दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचे निदान

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती हृतिक रोशन याने दिली आहे. इन्स्टाग्रामवर भावपूर्ण पोस्ट टाकत हृतिकने वडिलांच्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे.

69 वर्षीय राकेश रोशन यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी “घर घर की कहानी’ चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर पराया धन, बुनियाद, कामचोर, खूबसूरत अशा अनेक चित्रपटांत काम केले. दिग्दर्शक म्हणून त्यांनी खुदगर्ज, खून भरी मांग, करण अर्जुन, कोयला यासारखे चित्रपट दिले. ‘कहो ना… प्यार है’ चित्रपटातून त्यांनी हृतिकला लॉंच केले होते. त्यानंतर कोई मिल गया, क्रिश, क्रिश 3 आणि काबिल यासारखे चित्रपट पिता-पुत्राच्या जोडीने दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेष म्हणजे राकेश रोशन यांची कन्या सुनैनाला काही वर्षांपूर्वी सर्विकल कॅन्सरचे निदान झाले होते. मात्र तिने कर्करोगाला यशस्वी टक्कर दिली. त्यामुळे राकेश रोशनही कर्करोगाला यशस्वी फाईट देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नफिसा जोसेफ यांना कर्करोगाचे निदान झाले, तर अभिनेता इरफान खानही न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर या आजाराशी झुंज देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)