रेल्वे प्रवास रद्द झाल्यास आता तुमचं तिकीट ट्रान्सफर होऊ शकतं!

मुंबई : रेल्वे प्रवासाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग नंतर आता आयआरटीसीकडून रेल्वे प्रवाशांसाठी आणखीन एक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयआरटीसीने उपलब्ध करून दिलेल्या या नव्या सुविधेनुसार आता रेल्वे प्रवाशांना आपला प्रवास काही कारणास्तव रद्द झाल्यास आपले तिकीट दुसऱ्याच्या नवे ट्रान्सफर करता येणार आहे.

रेल्वेचा प्रवास इतर प्रवासी साधनांपेक्षा तुलनेने स्वस्त असल्याने आपण अनेकदा प्रवासाची तिकिटे अडव्हान्स बुकिंग करून ठेवतो मात्र काही कारणामुळे आपला प्लॅन बदलतो आणि अशावेळेस तिकीट रद्द करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. आत्तापर्यंत हे तिकीट दुसऱ्या कुणाला वापरताही येत नव्हतं त्या मुळे ते रद्द करावं लागायचं. परंतु आता मात्र असं न करता हे, तिकीट तुमच्या कुटूंबियांच्या नावावर ट्रान्सफर करण्याची सुविधा रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे. परंतु ही संधी एका तिकिटासाठी तुम्ही एकदाच वापरू शकता. तिकीट ट्रान्सफर तुम्हला प्रवासापूर्वी २४ तास अगोदर पूर्ण करायचं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कश्या प्रकारे तुमचं तिकीट ट्रान्सफर होऊ शकतं-
आपलं तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी अगोदर त्या तिकीटाची प्रिन्ट काढून घ्या.आणि आपल्या जवळचं तिकीट खिडकी गाठा. ज्या व्यक्तीला तुमच्या तिकीटावर प्रवास करायचाय त्याचा ओरिजनल आयडी प्रूफ सोबत ठेवा. स्टेशनवर जाऊन काऊंटर ऑफिसरला हे तिकीट ट्रान्सफर करायचं आहे, हे सांगा… ऑफिसर तुमच्याकडे व्यक्तीशी संबंधाची मागणी करेल. तुम्ही त्या व्यक्तीसोबत ब्लड रिलेशनचा प्रूफ दिला तर हे तिकीट त्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केलं जाईल. मात्र तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना हे तिकीट ट्रान्सफर करू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)