हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास परवाना रद्द – सुभाष देशमुख

सोलापूर – हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना कृषि उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा, असे आवाहन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि ई-नाम योजनेच्या पुरस्कारांचे वितरण शनिवारी सोलापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते येथे झाले. यावेळी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. मात्र बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही. त्यामुळे बाजार समितीच्याबाबत काही सुधारणा कराव्या लागल्या. शेतकऱ्यांना भाव मिळावा या हेतुने बाजार समितीची सुरवात झाली. पण काही बाबतीत चुकीच्या प्रथा पडल्या. त्या दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.

राज्यातील जास्तीत जास्त बाजार समित्यांनी ई-नाम योजनेत सहभागी व्हावे, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. कारण ई-नाम योजनेत सहभागी झाल्यामुळे शेतकऱ्यांना देशभरातील बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे स्पर्धा होऊन शेतकरींना चांगला भाव मिळतो आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)